Advertisement

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
SHARES

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाने पुन्ही हजेरी लावली आहे.

पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर आज वाढला आहे. तर अंधेरी सबवे पानी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणात पावसाची हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात आता पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा