Advertisement

मतदारांच्या मदतीसाठी बीएमसीकडून प्रत्येक वॉर्डात हेल्प डेस्क

कोरोना संकटामुळे मतदार केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी मतदार केंद्र ८ हजारांहून ११ हजार करण्यात येणार आहे.

मतदारांच्या मदतीसाठी बीएमसीकडून प्रत्येक वॉर्डात हेल्प डेस्क
SHARES

मुंबई महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाले, नावात कानामात्राचा बदल, राहत्या पत्यात बदल असे काही कारण असले तरी प्रत्येक व्यक्तीला मतदान करता यावे यासाठी प्रत्येक वॉर्डात हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय मतदानाचा आकडा वाढण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असून हेल्प डेस्कच्या माध्यमातून प्रत्येक अडचण दूर करण्यात येणार आहे. 

एखाद्या भागात इमारत पुनर्विकासासाठी गेली असेल, तर त्या ठिकाणचा मतदार अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असेल, काही तांत्रिक कारणांमुळे मतदार यादीतून नाव गहाळ झाले असल्यास, नावात किंवा पत्त्यात बदल अशा मतदार राजाच्या मदतीसाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात हेल्प डेस्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना संकटामुळे मतदार केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी मतदार केंद्र ८ हजारांहून ११ हजार करण्यात येणार आहे. तसेच, एका मतदार केंद्रावर १,२०० ऐवजी ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असे नियोजन करण्यात येत आहे.

नावात बदल, पुनर्विकासात किंवा दुसरीकडे रहायला गेल्याने पत्त्यामध्ये झालेला बदल, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे अशा सुविधा ‘हेल्प डेस्क’च्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. पालिकेच्या वेबसाइटवरदेखील मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याबाबत खात्री करता येणार आहे. पालिकेच्या वेबसाईटवर मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती अपलोड करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा