Advertisement

हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांसाठी मदतीची मागणी


हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांसाठी मदतीची मागणी
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं वाहतुक सेवा बंद केली आहे. त्यामुळं हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांवर आर्थिक संकट आलं आहे. तसंच, कोरोनाला नियंत्रण आणण्यासाठी त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. महिना उलटूनही हाताला काम नसल्यानं अनेक रिक्षा चालकांसमोर जगायचे कसं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रिक्षा चालकांच्या या गंभीर समस्येवर सरकारनं प्रत्येक रिक्षा चालकाला १०,००० रुपयांची मदत करावी, अशी मागणी सेंटर ऑफ ट्रेड युनियन-लाल बावटा (सिटू) यांच्या वतीनं करण्यात आली आहे. रिक्षा व्यावसायिकांच्या व्यथा मांडण्याकरीता अभिनव आंदोलन घेण्यात आले. रिक्षाचालकांचे कुटुंब वाचवा आर्थिक सहाय्य करा, असं फलक घेऊन घराबाहेर येऊन हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्या नियमांचं काटेकोर पालन करून हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालकांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात पत्रही पाठवण्यात आल्याची माहितीही समोर आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा