Advertisement

गृहविलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधारासाठी मदत क्रमांक

मुंबईतील गृह विलगीकरणातील रुग्णांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट स्टेप वन संस्था सरसावली आहे.

गृहविलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधारासाठी मदत क्रमांक
SHARES

कोरोनामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाविषयक माहितीच्या भडिमारामुळे अनेक मानसिक आजार वाढू लागले आहेत. मुंबईतील गृह विलगीकरणातील रुग्णांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट स्टेप वन संस्था सरसावली आहे. 

निराश झालेल्या, एकटेपणा जाणवणाऱ्या गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी मदत क्रमांक तयार करण्यात आला आहे. याशिवाय या रुग्णांसाठी व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांसाठी आवश्यक अशी सर्व माहिती देणारी डिजिटल पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांना एकटे पाडू नये तसेच या रुग्णांनीही मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे नातेवाईकांच्या संपर्कात रहावं, असं आवाहन या पुस्तिकेतून करण्यात आलं आहे.

रुग्णाला तणावयुक्त, उदास, एकटे, चिंता, काळजी  वाटत असेल तर अशा रुग्णांना मानसिक  आधारासाठी १८००-१०२-४०४० हा मदत क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर काॅल केल्यास रुग्णांचं समुपदेशन केलं जाणार आहे. 

मुंबईत ६ लाख ७१ हजाराहून अधिक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. अशा रुग्णांची अचानक प्रकृती बिघडल्यास त्यांनी काय करावे, किंवा काय करू नये याची माहिती देणारी पुस्तिका प्रोजेक्ट स्टेप वन या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.




हेही वाचा -

पश्चिम उपनगरातील 'हे' भाग ठरताहेत कोरोनाचा हॉटस्पॉट

  1. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा