Advertisement

'त्यांना' जगण्याचं बळ देणारा मदतीचा हात!


SHARES

दादर - मुकबधिर महिलांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचा हा ध्यास. 1983 पासून बॉम्बे फाऊंडेशन ऑफ डेफ वुमन संस्थेने हा ध्यास घेतलाय. 

फक्त शहरी भागातच नाही तर गावागावात जाऊन ही संस्था या महिलांना नव्या उद्योगातून रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देते. दादरच्या डिसिल्व्हा शाळेत बॉम्बे फाउंडेशन ऑफ डेफ वुमेन या संस्थेच्या वतीने हा प्रशिक्षिण शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

विशेष म्हणजे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या पत्नी विनोदा राव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचसोबत जपानच्या सामाजिक कार्यकर्त्या मसाको यांनी यावेळी सांकेतिक भाषेत महिलांशी संवादही साधला. मूकबधिर महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं यासाठी काम करणाऱ्या बॉम्बे फाऊंडेशन ऑफ डेफ वुमेन संस्थेला मुंबई लाइव्हचा सलाम...!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा