Advertisement

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी मुंबईत 'हिरकणी कक्ष' सुरू

सार्वजनिक ठिकाणी 'हिरकणी कक्ष' हे एक खास ठिकाण आहे जिथे माता आपल्या बाळाला दूध पाजू शकतात, बाळांची काळजी घेऊ शकतात किंवा इतर कामे करू शकतात.

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी मुंबईत 'हिरकणी कक्ष' सुरू
SHARES

सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरण रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत. पण आता मातांची हिच अडचण मार्गी लागणार आहे.  

रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉस्पिटल, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनपान करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, माता व बालकांच्या सोयीसाठी मुंबई शहरातील विविध भागात हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत आहेत.

बालकांना दूध पिण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात १७ हिरकणी कक्ष उभारण्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी सायंकाळी मुंबई सेंट्रल बसस्थानकावर पहिल्या हिरकणी वर्गाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम विशेष कामांवर खर्च केली जाते. याअंतर्गत मुंबईतील विविध बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व खोल्या वातानुकूलित असतील. या खोल्यांमध्ये महिला आणि मुले विश्रांती घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यात अशी सुविधा व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा

रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार

नवी मुंबईत हेल्मेटचा वापर अनिवार्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा