हा कचरा कोण साफ करणार?

 Mumbai
हा कचरा कोण साफ करणार?

दहिसर - मागील एका आठवड्यापासून दहिसरच्या म्हाडा कॉलनीसमोर कचरा साचला आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे. इतकच नाही तर म्हाडातल्या रहिवाशांनी याची तक्रार पालिकेच्या आर उत्तर विभागाकडे केली तरीही हा कचरा इथून उचलण्यात आला नसल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. याच ठिकाणी थोड्या अंतरावर सरदार वल्लभभाई शाळा देखील असल्याने विद्यार्थ्यांनाही रोज या घाणीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात पालिका आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी निवडणुकीत व्यस्त असल्याचं सांगून समस्या सोडवण्याऐवजी हात झटकले.

Loading Comments