वरळीत बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह

  Worli
  वरळीत बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह
  मुंबई  -  

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुरुवारी रात्री वरळीतील आंबेडकर भवनात हजारोंच्या संख्येने अनुयायांनी उपस्थिती राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. 

  बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या सर्व इमारतींना विद्युत रोषणाई कऱण्यात आली. काही ठिकाणी निळ्या रंगाची उधळण करून, 'बाबासाहेबांचा विजय असो', 'एकच साहेब बाबासाहेब' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर, स्थानिक आमदार सुनील शिंदे, नगरसेवक संतोष खरात, आशिष चेंबूरकर, उप महापौर हेमांगी वरळीकर यांची उपस्थिती होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.