Advertisement

धारावीतील २५०० लोक होम क्वारंटाइन

धारावीतील बालिका नगर परिसरातील २ हजार ५०० लोकांचं होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

धारावीतील २५०० लोक होम क्वारंटाइन
SHARES
Advertisement

धारावीतील बालिका नगरमध्ये ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर आणखी एक रूग्ण येथे आढळून आला. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर धारावीतील  बालिगा नगर परिसरातील २ हजार ५०० लोकांचं होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांना मुंबई महानगर पालिकेकडून पुरवल्या जाणार आहेत.

 बालिका नगर परिसरात ३०८ सदनिका  आणि एकूण ९१ दुकानं आहेत. हा संपूर्ण परिसरच सील करण्यात आला आहे. वरळी येथील रहिवासी असलेला आणि बालिका नगर परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. तो सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे त्याच्यासोबत धारावीमध्ये काम करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांच्या हातावरही होम क्वारंटाइनचा  शिक्का मारण्यात आला आहे त्यांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 

 मृत्युमुखी पडलेला व्यक्ती हा तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा संशय आहे. मात्र या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ही बाब नाकारली आहे. पोलिस याचा अधिक शोध घेत आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ७० हाय रिस्क असलेल्या व्यक्तींची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. या हाय रिस्क व्यक्तींमध्ये सायन रुग्णालयातील काही व्यक्तींचा समावेश आहे, उपचारांसाठी तो या रुग्णालयात गेला होता. हेही वाचा -

धारावीतील डॉक्टरला कोरोनाची लागण, हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारत सील

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
संबंधित विषय
Advertisement