Advertisement

मुंबईतील राणीबागेत सुरू होणार हॉटेल

महापालिकेनं राणीच्या बागेत एक हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील राणीबागेत सुरू होणार हॉटेल
SHARES

मुंबई महापालिका दरवर्षी उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. अशातच महापालिकेनं राणीच्या बागेत एक हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राणीच्या बागेत देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळं आता या पर्यटकांना राणीच्या बागेत खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून महिन्याला पालिकेला ५.३० लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.

भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन कक्ष असलेल्या इमारतीत हे हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. या हॉटेलात पर्यटकांना मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी आणि कॉण्टिनेंटल खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या हॉटेलसाठी महापालिका आपली जागा कंत्राटदाराला ५ वर्षांसाठी भाडेकरारानं देणार आहे. दरमहा साडेपाच लाख रुपये भाडं आकारलं जाणार असून, दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या हॉटेलात २०० जणांची आसन व्यवस्था असणार आहे. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे हॉटेल खुलं राहणार आहे. परंतु, बुधवारी सुट्टीचा दिवस असल्यानं ते बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेनं राणीबाग व प्राणीसंग्रहालय यांच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं मंजुरी दिली असून, त्यानुसार आता महापालिकेनं अंमलबजावणी सुरू केली आहे.

राणीच्या बागेत नव्यानं एंट्री प्लाझा विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये तिकीटघर, पाणपोई, प्रसाधनगृह, क्लॉक रूम या सुविधांचा समावेश आहे. तसंच, प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारात इलेक्ट्रॉनिक प्रवेशयंत्रणा उभारण्यात आली आहे, तर उद्यान परिसरातील रोझ बाग, जपानी गार्डनसह हरितबागा विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय १७ प्राण्यांच्या पिंजऱ्यांचं बांधकाम सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.



हेही वाचा -

Corona Virus: ५०% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करा - पालिका

मुंबईतील १० टॅक्सींवरच ‘रूफलाइट इंडिकेटर’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा