Advertisement

मुंबईतील १० टॅक्सींवरच ‘रूफलाइट इंडिकेटर’

महिनाभरात रुफलाईट इंडिकेटर बसवलेल्या केवळ १० काळ्या-पिवळ्या टॅक्सींची नोंद ताडदेव विभागांतर्गत करण्यात आल्याचं समजतं.

मुंबईतील १० टॅक्सींवरच ‘रूफलाइट इंडिकेटर’
SHARES

रस्त्यावरून धावणारी टॅक्सी (Taxi) रिकामी आहे की नाही, हे प्रवाशांना (Passengers) समजण्यासाठी मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर ३ रंगांचे दिवे (Three Color light) लावण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला होता. १ फेब्रुवारीपासून याच्या अंमलबजावणीसही सुरुवात झाली. परंतु, या सुविधेला महिना पुर्ण झाला असून महिनाभरात केवळ १० काळ्या-पिवळ्या टॅक्सींनाचं हे इंडिकेटर बसविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महिनाभरात रुफलाईट इंडिकेटर (Roof light indicator) बसवलेल्या केवळ १० काळ्या-पिवळ्या टॅक्सींची नोंद ताडदेव विभागांतर्गत करण्यात आल्याचं समजतं. रस्त्यावर उभी असलेली एखादी काळी-पिवळी टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही हे कळण्यासाठी 'रूफलाइट इंडिकेटर' बसवण्यासंदर्भातील बैठक जानेवारीत पार पडली होती. यावेळी परिवहन अधिकाऱ्यांसह इंडिकेटर उत्पादकांमध्ये विविध तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा होऊन टॅक्सीवर असे इंडिकेटर बसवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

१ फेब्रुवारीपासून याबाबत अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नव्या नियमानुसार, केवळ इंडिकेटर बसवलेल्या टॅक्सींची नोंदणी केली जात असून, इंडिकेटरशिवाय येणाऱ्या टॅक्सींची नोंदणी थांबवण्यात आल्याचं सनजतं. शोरूममधून वाहन विकत घेतल्यानंतर त्यावर 'रूफलाइट इंडिकेटर' बसवणं बंधनकारक आहे. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी आरटीओच्या निरीक्षकाद्वारे करून टॅक्सीच्या छतावर इंडिकेटर असल्यानंतरच वाहननोंदणीला हिरवा कंदील दाखवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्चपर्यंत ताडदेव विभागात १० टॅक्सीची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील अॅपअधारित चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्यानं पारंपरिक काळ्या-पिवळ्या टॅक्सींचं प्रमाण घटत असल्याचं निरीक्षण वाहतूकतज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

रुफलाईट इंडिकेचरचा उपयोग

  • टॅक्सींच्या छतावर ३ रंगांतील इंडिकेटर बसवले जातील.
  • 'रूफलाइट इंडिकेटर'मुळे टॅक्सीचालक तसेच प्रवाशांमध्ये सेवा नाकारण्याबाबत होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे.
  • गाडीची सेवा उपलब्ध असल्यास इंडिकेटरवर हिरवा रंग, सेवा बंद असल्यास पांढरा, तर टॅक्सीत प्रवासी असल्यास लाल रंग सुरू राहील.
  • गाडीची उपलब्धता तत्काळ समजणार आहे.
  • लवकरच इतर टॅक्सी तसेच रिक्षांवर हे रूफलाइट इंडिकेटर बसवण्यात येणार आहे.
  • विहित कालावधीत हे इंडिकेटर न बसवल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: एसटी कर्मचारीही घालणार मास्क, कोरोना टाळण्यासाठी उपाय

Corona Virus:कस्तुरबा, सेव्हन हिल्स, केईएम रुग्णालयाजवळी वाहतूक बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा