Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

Corona virus:कस्तुरबा, सेव्हन हिल्स, केईएम रुग्णालयाजवळी वाहतूक बंद

'कोरोना'वर उपचार सुरू असेलेल्या कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्ससह केईएम रुग्णालय परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले

Corona virus:कस्तुरबा, सेव्हन हिल्स, केईएम रुग्णालयाजवळी वाहतूक बंद
SHARES

हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना विषाणुचे रुग्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या आणखी वाढू नये म्हणून विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयांच्या जवळची वाहतूक बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

हेही वाचाः- एक अर्ज अवैध झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

'कोरोना'चे रुग्ण वाढत असल्याने 'कोरोना'वर उपचार सुरू असेलेल्या कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्ससह केईएम रुग्णालय परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. त्यासाठी पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यात खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, शाळा, स्विमिंग पूल, जिम, चित्रपटगृह बंद ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कार्यक्रम आयोजित करू नयेत, चौपाटीवर एकत्र जमू नये अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून गरज असेल तर केवळ ५० टक्के स्टाफ ला कामावर बोलवावे असेही आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचाः- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता ३९ वर जाऊन पोहचील आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्ण समोर येत असल्यामुळे सरकारच्या डोकेदुखी वाढत चालली आहे. यात मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केले आहे. तर खासगी कंपन्यांना ही कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याबाबत सूचना देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. त्याच बरोबर शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, तरणतलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.  गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा