Advertisement

Coronavirus Updates: एसटी कर्मचारीही घालणार मास्क, कोरोना टाळण्यासाठी उपाय

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळानं प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus Updates: एसटी कर्मचारीही घालणार मास्क, कोरोना टाळण्यासाठी उपाय
SHARES

करोनाचा संसर्ग (Cororna Virus) टाळण्यासाठी एसटी महामंडळानं (MSRTC) प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत मास्क (MASK) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं एसटीतील वाहक, चालक, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक व इतर कर्मचाऱ्यांना हे मास्क देण्यात आले आहेत.

एसटी महामंडळात सुमारे ७० हजार चालक-वाहक आहेत. तिकीट देताना (Ticket) वाहकांचा प्रवाशांशी थेट संपर्क येतो. एसटी ही अत्यावश्यक सेवा असल्यानं ती तात्पुरतीही बंद करता येणार नाही. वाहक व चालकांसह वाहतूक नियंत्रक, निरीक्षक हे सातत्यानं प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळं त्यांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap) यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil parab) यांच्याकडे मागणी केल्याची माहिती मिळते. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

रेल्वे प्रशासनानं (Railway) देखील लोकल (Local) स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकल स्वच्छ केली जात आहे. त्याचप्रमाणं, परदेशी प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची तापासणी करण्याचाही महत्वाचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं या गर्दीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या तापमानात आणखी वाढ होणार

Coronavirus Updates: तिकीट देण्यापूर्वी पश्चिम रेल्वेकडून परदेशी नागरिकांची तपासणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा