मांज्यात अडकलेल्या घारीची सुटका

माहिम - येथील क्राऊन बेकरी येथे एक घार शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास पंतगच्या मांज्यात अडकून लटकत होती. याप्रकरणी स्थानिक नागरीक शशांक विरकूड यांनी फायर ब्रिगेडला कळवले. सकाळी 9 च्या दरम्यान या घारीची सुटका फायर ब्रीगेडच्या कर्मचाऱ्यांनी केली.

या परिसरात गेल्या 2 महिन्यांपूर्वी एक कबूतर अडकून मेले, तसंच परिसरात पंतग खेळणाऱ्या मुलांनी पतंग तुटल्यानंतर मांजा तसाच सोडून दिल्यामुळे यामध्ये पक्षी अडकण्याच्या घटना घडत आहेत, अशी प्रतिक्रीया विरकूड यांनी या वेळी दिली.

सरकारने धारदार मांज्यावर बंदी आणली आहे. परंतु काही ठिकाणी या नियमांचे पालन केले जात नाही त्याचा हा परिणाम आहे. पण एखाद्या पक्षाचा जीव जाईल असे खेळ खेळू नका, एवढेच आवाहन एक पक्षी प्रेमी म्हणून मी मुंबईकरांना करेन अशी प्रतिक्रीया प्रमोद माने यांनी दिली.

Loading Comments