Advertisement

मुंबईत पुन्हा एकदा रक्ताचा मोठा तुटवडा

मुंबईत केईएम, नायर, कूपर, वाडिया, के. बी. भाभा रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, अनेक पालिका आणि सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत पुन्हा एकदा रक्ताचा मोठा तुटवडा
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईत पुन्हा रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवटा निर्माण झाला आहे. वारंवार रक्ताची गरज भासणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त बालकांची वणवण सुरू झाली आहे. मुंबईत केईएम, नायर, कूपर, वाडिया, के. बी. भाभा रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, अनेक पालिका आणि सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात महाविद्यालये बंद असल्याने बहुतांश लोक बाहेर फिरायला जात असल्याने तुटवडा जाणवतो. परंतु गेल्या वर्षभरात करोनामुळे मोठी शिबिरे बंद होती. मधल्या काळात विविध सणांच्या निमित्तानं काही ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवली गेली. परंतु पुन्हा यात मोठा खंड पडला असल्याने मुंबईतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे.

सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात केवळ ३० रक्तपिशव्या आहेत. इथं जवळपास ३०० थॅलेसेमिया रुग्ण उपचार घेत आहेत. रक्ताचा साठा नसल्यानं सध्या या बालकांसाठी आता रक्तदाते शोधण्याची वेळ आली आहे. 

गतवर्षी मार्चमध्ये करोना संसर्गामुळं हीच अवस्था निर्माण झाली होती. त्यानंतर एप्रिल, मेमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. कोरोनाचा ससंर्ग पुन्हा वाढत असल्यानं याही वर्षी पुढील २ महिन्यांत रक्त मिळविण्यासाठी रुग्णांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आतापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे.



हेही वाचा -

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा