Advertisement

...तर मी जल्लाद व्हायलाही तयार- आनंद महिंद्रा


...तर मी जल्लाद व्हायलाही तयार- आनंद महिंद्रा
SHARES

उन्नाव आणि कठुआ बलात्कार घटनेतील बलात्काऱ्यांना फाशी देण्याची वेळ आली, तर माझी जल्लाद होण्याची तयारी असल्याचं ट्विट करत महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपला संताप व्यक्त केला.


देशभरातून टीका

उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून उन्नाव-कठुआ प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा आणि बलात्काऱ्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत निषेध सभा, कँडल मार्च काढण्यात येत आहे.


बाॅलिवूडमधून निषेध

सोशल मीडियावरून या घटनेचा संताप व्यक्त केला जात असून बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी सर्व स्तरातून होत आहे. देशात बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर बाॅलिवूड म्हणावं तसं व्यक्त होत नाही, पण यावेळी याला बाॅलिवूड अपवाद ठरलं असून बाॅलिवूडकरही पुढं येऊन संपात व्यक्त करत आहेत.



उद्योजकांमधून पुढाकार

बाॅलिवूडकरांपाठोपाठ आता उद्योजकही आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच एक ट्विट करत या बलात्काऱ्यांना फाशी देताना आपण जल्लादाचं काम करावं, अशी इच्छा दर्शवली आहे.


काय म्हणाले आनंद महिंद्रा?

"जल्लादची नोकरी कुणालाचं हवीशी वाटत नाही. पण जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल, तर मात्र मी ही नोकरी आनंदानं स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतोय, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमुळं माझं रक्त खवळतं" असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.



हेही वाचा-

उन्नाव, कठुआतील बलात्काऱ्यांना फाशी द्या, मुंबईत जनआक्रोश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा