Advertisement

…म्हणून दराडे कुटुंबाने अडवला महापालिकेचा बंगला

महापालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तांनी शासनाचे सेवा निवासस्थान अडवल्यामुळेच दराडे दाम्पत्याने महापालिकेचे मलबार हिलमधील सेवानिवासस्थान सोडले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दराडे कुटुंबाला त्वरीत तिथून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी सुधार समिती सदस्यांनी केली आहे.

…म्हणून दराडे कुटुंबाने अडवला महापालिकेचा बंगला
SHARES

मुंबई महापालिकेतील कोणत्याही पदावर नसताना मलबाल हिल येथील बंगला सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि पल्लवी दराडे दाम्पत्याने अडवल्यामुळे जोरदार रान उठले आहे. महापौरांना सेवा निवासस्थान नाही. त्यांच्या सेवा निवासस्थानाचा शोध सुरु असताना दराडे दाम्पत्याने हा बंगला अडवल्याने पुन्हा सुधार समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

'त्यांनी' अडवले, म्हणून आम्ही नाही सोडले!'

महापालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तांनी शासनाचे सेवा निवासस्थान अडवल्यामुळेच दराडे दाम्पत्याने महापालिकेचे मलबार हिलमधील सेवानिवासस्थान सोडले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दराडे कुटुंबाला त्वरीत तिथून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी सुधार समिती सदस्यांनी केली आहे.

दराडेंना वेगळा न्याय का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहायक असलेले सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि महापालिकेच्या माजी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे हे सेवेत नसतानाही अद्याप मलबार हिल येथील जलअभियंता विभागाच्या सेवानिवासस्थानात राहत आहेत. त्यामुळे याबाबत शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेची अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्यांनी एक दोन महिने अधिक राहिल्यास पोलिसांचा फौजफाटा घेऊन ते घर खाली करायला लावले जाते. मग दराडे यांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी केला.

मात्र, प्रशासनाकडून उपायुक्त (सुधार)चंद्रशेखर चौरे यांनी हे निवासस्थान ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

'पुढच्या बैठकीपूर्वी निर्णय घ्या'

आपल्याला शासनाचे उपकार नकोत. महापौरांसाठी सेवा निवासस्थान नसून अशा प्रकारे जर बाहेरील सनदी अधिकारी महापालिकेचे सेवा निवासस्थान अडवून ठेवणार असतील, तर चालणार नाही. त्यामुळे पुढील बैठकीपूवी यावर निर्णय घेण्याची मागणी विशाखा राऊत यांनी यावेळी केली. त्यानुसार सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा