Advertisement

आयएएस विजय सिंघल नवे ठाणे महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करून त्यांच्या जागी विजय सिंघल यांची नवे ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस विजय सिंघल नवे ठाणे महापालिका आयुक्त
SHARES

राज्य सरकारने गुरूवारी ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करत त्यांच्याकडे नव्या विभागांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यातही महत्त्वाचं म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करून त्यांच्या जागी विजय सिंघल यांची नवे ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि जयस्वाल यांच्यात चकमकी उडत होत्या. 

हेही वाचा- ‘त्या’ १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ठाणे महपालिकेतील सत्ताधारी शिवसेनाआणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात सातत्याने खटके उडत असल्याने जयस्वाल यांनी थेट मुख्य सचिवांना पत्र पाठवून बदलीची मागणी केली होती. जयस्वाल मागील ५ वर्षांपासून सर्वाधिक काळ ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे नवीन सरकार सत्तेत येताच जयस्वाल यांची बदली होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. जयस्वाल यांची कोणत्या पदावर बदली करण्यात हे अजून स्पष्ट झालेले नाही.

ठाणे पालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेले मूळचे आग्रा येथील विजय जगदिशप्रसाद सिंघल हे १९९७च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सिंघल यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी काम केलं असून, साखर आयुक्त, इंडस्ट्रीज डेलपमेंट आयुक्त व मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्तपदीही त्यांनी काम केलं आहे.

‘या’ सनदी अधिकाऱ्यांची बदली 

  • रणजित कुमार यांची नियुक्ती संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई या पदावर
  • एमजी अर्दड यांची नियुक्ती आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद या रिक्त पदावर
  • विजय सिंघल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे या पदावर
  • एल एस माळी यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई या रिक्त पदावर
  • अभिजीत बांगर यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर या रिक्त पदावर
  • यू. ए. जाधव यांच्या आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई या रिक्त पदावर
  • मदन नागरगोजे संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई, यांची नियुक्ती सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर
    Read this story in हिंदी
    संबंधित विषय
    Advertisement
    ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा