Advertisement

‘त्या’ १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून वगळलेल्या २८ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘त्या’ १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
SHARES

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून वगळलेल्या २८ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कोकण विभागीय आयुक्तांच्या अभिप्रायानंतर घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा आणि कोळे या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात येईल.

तर, आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर आणि देसलेपाडा ही गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतच राहतील. 

हेही वाचा- भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा

तत्पूर्वी, कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शीळ कल्याण रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या ९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं आहे. त्यामुळे ही ९ गावे महानगरपालिका क्षेत्रात कायम राहणार असून, इतर १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनाद्वारे विधान परिषदेत सांगितलं होतं. 

अहवाल सादर 

फडणवीस सरकारच्या काळात या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय झाला होता. तेव्हापासून विविध नागरी संघटनांनी आंदोलने केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातून २७ गावे वगळून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी अधिसूचना जाहीर करत, त्याबाबत हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार, कोकण विभागीय आयुक्तांकडे हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या आणि ११ व १२ मार्च रोजी आयुक्तांनी त्यावर सुनावणी घेतली. कोकण विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा