Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ

कोरोना व्हायरसचा (COVID-19) सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा स्थितीत या वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईं करण्यात येईल, असं छगन भुजबळ म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ
SHARES

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) उद्रेकामुळे देशभरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. एका बाजूला सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवत असताना बाजारात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशा स्थितीत जीवनावश्यक वस्तूचा (black marketing of Essentials) काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार आणि संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food and civil supply minister Chhagan bhujbal) यांनी दिली.

हेही वाचा- कोरोनाचा कहर - LIVE UPDATES

यासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले, सध्यस्थितीत राज्यात कोरोना व्हायरसचा (COVID-19) सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तू सहजासहजी व रास्त भावात उपलब्ध होणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे.

कठोर कारवाई

दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा (daily Essentials) तुटवडा असल्याचं भासवून त्याचा साठा करणं व त्यांची चढ्या भावाने विक्री करणं अशी परिस्थिती उद्‌भवल्याचं निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तू अधिनियम, १९५५ व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार (black marketing) प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसंच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश

केंद्र शासनाच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर’ (sanitizer and mask) यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचंही  भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा- उजबेकीस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांचा जयंत पाटलांना व्हिडिओ काॅलसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा