Advertisement

IIT राउरकीकडून महापालिकेला हँगिंग गार्डनच्या मागे पर्यायी टाकीचा प्रस्ताव

हँगिंग गार्डनच्या मागे मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती होईपर्यंत आवश्यक असलेली पर्यायी टाकी 52MLD असू शकते, असे IIT रुरकीच्या अहवालात म्हटले.

IIT राउरकीकडून महापालिकेला हँगिंग गार्डनच्या मागे पर्यायी टाकीचा प्रस्ताव
SHARES

हँगिंग गार्डनच्या (Hanging garden) मागे मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती होईपर्यंत आवश्यक असलेली पर्यायी टाकी 91MLD पेक्षा खूपच कमी असू शकते असे IIT रुरकीच्या अहवालात म्हटले.

संस्थेने 52MLD टाकीची शिफारस केली आहे, ज्यांना 91MLD टाकीसाठी 387 झाडे तोडावी लागली असती त्याबद्दल चिंतित असलेल्या वृक्षप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर (abhijeet bangar) यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की टाकी आणखी लहान असू शकते.

“आम्ही पर्यायी टाकी बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आम्हाला टाकीचे तपशीलवार स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक आहे,” असे अभिजित बांगर म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले "एकदा ते पूर्ण झाले की, आम्ही जलाशयाची दुरुस्ती सुरू करू. तसेच पर्यायी टाकी पूर्ण होण्यासाठी 12 ते 18 महिने लागतील आणि दुरुस्तीची पद्धत आयआयटी बॉम्बेच्या देखरेखीखाली ठरवली जाईल.”

पर्यायी टाकीचे स्थान, आकार आणि क्षमता याविषयी बोलताना अभिजित बांगर म्हणाले की IIT रुरकीने 52MLD क्षमतेची शिफारस केली असली तरी महापालिकेनुसार 32 ते 35 MLD ची क्षमता पुरेशी असेल. "आम्ही IIT बरोबर यावर पुन्हा चर्चा करू आणि जर ते सहमत असतील तर टाकीच्या प्रस्तावित क्षमतेत सुधारणा केली जाईल," ते म्हणाले. 

IIT रुरकीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीची आवश्यकता नाही कारण ते चांगल्या स्थितीत आहे. अभिजित बांगर (abhijeet bangar)  म्हणाले, “येथे दोन मुख्य कप्पे आहेत, 1 आणि 2, आणि पाच उप-कंपार्टमेंट, 2A, 2B, 1A, 1B आणि 1C.” 

अतिरिक्त महापालिका आयुक्त पुढे म्हणाले की, आयआयटी रुरकीने मलबार हिल जलाशय वापरला जात असताना त्याची दुरुस्ती करणे शक्य होणार नाही असे सांगितले होते. "यासाठी पर्यायी टाकीची आवश्यकता होती." 



हेही वाचा

ठाणे: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेसाठी टीएमसीची हेल्प डेस्क सुरू

पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा