Advertisement

अंधेरीत रस्त्यालगतची बहुमजली बांधकामं जमिनदोस्त

महापालिकेच्या के. पश्चिम विभागातील 'वांद्रे दहिसर लिंक रोड' लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये १३ अनधिकृत बांधकामं करण्यात आली होती. या सर्व बांधकामांचा व्यावसायिक स्वरुपात वापर होत होता.

अंधेरीत रस्त्यालगतची बहुमजली बांधकामं जमिनदोस्त
SHARES

 अंधेरी पश्चिम परिसरातील लिंक रोडवरील स्टार बाजार समोरील रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत बहुमजली बांधकामं बुधवारी महापालिकेकडून तोडण्यात आली.  या बांधकामांपैकी ९ बांधकामं दुमजली होती, तर उर्वरीत बांधकामं एकमजली होती. या बांधकामांमुळे लिंक रोडवरील वाहतुकीस अडथळे निर्माण होत होती. 


१३ अनधिकृत बांधकामं 

महापालिकेच्या के. पश्चिम विभागातील 'वांद्रे दहिसर लिंक रोड' लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये १३ अनधिकृत बांधकामं करण्यात आली होती. या सर्व बांधकामांचा व्यावसायिक स्वरुपात वापर होत होता. त्यामुळं ही बांधकामे बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही १३ अनधिकृत बांधकामे तोडल्यामुळे अंधेरी पश्चिम परिसरातील लिंक रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. महापालिकेच्या के. पश्चिम विभागात जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा. ओशिवरा, वर्सोवा आणि वर्सोवा समुद्रकिनारा इत्यादी परिसरांचा समावेश आहे. हेही वाचा- 

शाळा शुल्कवाढीविरोधात एकट्या पालकाला तक्रार करता येणार नाही

Exclusive: म्हाडा लाॅटरी- घरांच्या किंमती १० टक्क्यांनी होणार कमी!
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा