Advertisement

Exclusive: म्हाडा लाॅटरी- घरांच्या किंमती १० टक्क्यांनी होणार कमी!

खुद्द मुंबई मंडळाच्या सभापतींनी म्हाडाला घरचा आहेर देत घर महाग असल्याचं जाहिरपणे सांगितलं आहे. त्यामुळेच घरांच्या किंमती कमी करण्यासाठी ते आग्रही असल्याच चित्र आहे. म्हाडा अध्यक्ष आणि म्हाडा उपाध्यक्ष यांना पत्र लिहित त्यांनी घरांच्या किंमती कमी करण्याची मागणीही केली आहे. याच मागणीनुसार पुढच्या आठवड्यात किंमती कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आल्याचं सभापतींनी सांगितलं आहे.

Exclusive: म्हाडा लाॅटरी- घरांच्या किंमती १० टक्क्यांनी होणार कमी!
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी १६ डिसेंबरला लाॅटरी फुटणार असून या लाॅटरीत अर्ज केलेल्या वा अर्ज करू पाहणाऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. लाॅटरीतील उच्च गट वगळता इतर गटातील घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी खास 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.

किंमतीवरून नाराजी

लाॅटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किंमती १४ लाखांपासून २० लाखांपर्यंत असून अल्प गटातील किंमती २० लाखांपासून ३५ लाखांपर्यंत आहेत. तर मध्यम गटातील किंमती ३५ ते ६० लाखांपर्यंत असून उच्च गटातील घरं ६० लाखांपासून थेट ६ कोटीच्या घरात विकली जाणार आहेत. नव्या धोरणानुसार किंमती कमी केल्यानंतरही घरं महागच असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. किंमतीवरून सर्वसामान्यांमध्ये नाराजीही आहे.

कमी प्रतिसाद

घरांच्या किंमती लक्षात घेत लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसादही मिळताना दिसत नाही. कारण लाॅटरीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात होऊन २३ दिवस झाले तरी अर्जस्वीकृतीचा आकाडा ३० हजार २०० च्याच घरात आहे. आतापर्यंत ७३ हजार ९६५ जणांना नोंदणी केली असून ७१ हजार १५५ जणांना अर्ज भरले आहेत. आता नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीसाठी केवळ १२ दिवस उरले आहेत.

मोठ्या संख्येनं इच्छुक मुंबईतील घरांच्या लाॅटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यामुळे मुंबईतील घरांवर इच्छुकांच्या उड्या पडतात. लाखोंनी अर्ज येतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून घरांच्या किंमती भरमसाठ वाढल्यानं इच्छुकांमध्ये नाराजी असून लाॅटरीला मिळणार प्रतिसाद कमी झाला आहे. हीच परिस्थिती यंदाच्या लाॅटरीतही दिसून येत आहे.

लवकरच बैठक

खुद्द मुंबई मंडळाच्या सभापतींनी म्हाडाला घरचा आहेर देत घर महाग असल्याचं जाहिरपणे सांगितलं आहे. त्यामुळेच घरांच्या किंमती कमी करण्यासाठी ते आग्रही असल्याच चित्र आहे. म्हाडा अध्यक्ष आणि म्हाडा उपाध्यक्ष यांना पत्र लिहित त्यांनी घरांच्या किंमती कमी करण्याची मागणीही केली आहे. याच मागणीनुसार पुढच्या आठवड्यात किंमती कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आल्याचं सभापतींनी सांगितलं आहे.

विजेत्यांना दिलासा

या बैठकीत अत्यल्प-अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विजेत्यांकडून घराची रक्कम वसूल करताना १० टक्के कमी करत घराची रक्कम घेतली जाणार असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. १० टक्क्यांनी घर स्वस्त झाल्यास हा विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.हेही वाचा-

म्हाडा लाॅटरीतील घरं महाग, मधू चव्हाणांचा म्हाडाला घरचा आहेर

प्रीमियम फायद्याचा, म्हाडाच्या तिजोरीत १०० कोटींची भर!Read this story in English
संबंधित विषय