SHARE

कुंभारवाडा - सी विभागातील कुंभारवाडा परिसरात फेरीवाले अनधिकृतपणे बस्तान मांडून बसले आहेत. हे फेरीवाले रस्त्यावर बिनधास्त गॅस शेगडी आणि स्टोव्हचा वापर करुन खाद्यपदार्थ बनवतात. तर, यावर विभाग अधिकारी आणि पोलीस इथल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसंच या फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरच कचरा फेकला जातो. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील समोर आलाय. गेल्या अनेक दिवसांमध्ये रस्त्यावर वडापावच्या गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. तरीही पालिका प्रशासनाला आणि फेरीवाल्यांना अजूनही जाग आलेली नाही. तर अशा फेरीवाल्यांवर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पदमाकर हंबीर यांनी केलीय. तर, या विषयी सी विभागातील सहाय्यक आयुक्त जिवक घेगडमल यांना विचारलं असता आपल्याकडे तक्रार आल्यावर कारवाई करु असं आश्वासन त्यांनी दिलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या