फेरीवाल्यांमुळे चेंबूरमध्ये घाणीचं साम्राज्य

 Chembur
फेरीवाल्यांमुळे चेंबूरमध्ये घाणीचं साम्राज्य
फेरीवाल्यांमुळे चेंबूरमध्ये घाणीचं साम्राज्य
See all

चेंबूर - येथील रेल्वे स्थानक परिसरात पूर्वी बोटांवर मोजण्याइतकेच फेरीवाले होते. मात्र सध्या या ठिकाणी सातशे ते आठशे फेरीवाले आहेत. रात्री दुकान बंद केल्यानंतर हे फेरीवाले कागद आणि प्लास्टिकचा कचरा कुंडीमध्ये न टाकता रस्त्यावरच टाकून घरी जातात. त्यामुळं सकाळी पालिका कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलावा लागतो. फेरीवाल्यांनी हा कचरा कुंडीत टाकल्यास पालिका कर्मचाऱ्यांचे काम कमी होईल. शिवाय चेंबूर परिसरही स्वच्छ होईल, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून मिळत आहे. वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता टाळण्यासाठी या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशीही या भागातल्या रहिवाशांची मागणी आहे.

Loading Comments