Advertisement

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी


अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडी
SHARES

परळ - वाढत्या वाहनांच्या तुलनेत पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने अनेक वाहनचालक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करताना दिसतात. परळ पूर्व येथील ग. द. आंबेकर मार्गावरील भोईवाडा नाका येथे देखील अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. या मार्गावरून मोनोरेल धावणार असून, ही मोनोरेल भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची सोय ठरणार असली तरी सध्या अनधिकृत पार्किंगचा अड्डा बनलीय. शेकडो वाहने या मोनोरेलच्या बीमचा आधार घेऊन दिवस रात्र येथे सर्रासपणे उभी केली जातात.
त्याचबरोबर रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. परिणामी वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. मोनोरेलमुळे या मार्गाची रुंदी पूर्वीपेक्षा वाढविण्यात आली असल्याने अवजड वाहने देखील येथून धावतात. विशेष म्हणजे या मार्गाची रचना एकंदरीत पाच मार्गांना जोडण्यात आली असून, याचा मध्य भोईवाडा नाका ठरतो. मात्र या पाच रस्त्याच्या रचनेच्या तुलनेत येथे सिंग्नल यंत्रणा अथवा वाहतूक पोलीस नसल्याने वाहने कोणत्या दिशेने केव्हा धावतात याचा अंदाज पादचाऱ्यांना येत नसल्याने रोज तारेवरची कसरत करीत रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे वाहनांना शिस्त लागावी यासाठी या अनधिकृत पार्किंगवर कारवाई होणे गरजेचे असून, वाहतूक पोलीस अथवा सिंग्नल यंत्रणा उभारण्याची गरज आहे. दरम्यान याबाबत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम थोरात यांच्याशी चर्चा केली असता सदरील ठिकाणी वाहतूक विभागाच्या वतीने अनधिकृतरित्या उभ्या असणाऱ्या वाहनांवर हायड्रॉलिक क्रेनच्या साह्याने कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा