भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्राच्या (maharashtra) काही भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, पुणे (pune), जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशीमसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
विशेषत: खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या भागातील जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 26 डिसेंबरपासून मुंबईसह (mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
27 तारखेला खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 डिसेंबरच्या दिवशी खानदेश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि विदर्भाच्या काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अहवालांकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे, असे कृषि विभागाने शेतकऱ्यांना सूचित केले आहे.
हवामानातील या बदलांबाबत जागरूक असणं शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य हानी कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांनी दैनंदिन हवामानाची माहिती ठेवावी आणि आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा