Advertisement

मुंबईत गुरुवारपर्यंत मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज


मुंबईत गुरुवारपर्यंत मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

सोमवार सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवसांत मुंबईसह राज्यातल्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 13 जुलैपासून पावसाने राज्यभरात हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर अजूनही कायम आहे.


मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

मुंबईतील सांताक्रूझ, विलेपार्ले, माटुंगा, माहिम, कुलाबा परिसरात पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. मुंबईच्या उपनगरांत म्हणजेच कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर, नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्तेवाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हवामान खात्याने मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाजही वर्तवला आहे. सोमवारी कुलाबा परिसरात एकूण 730. 1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ परिसरात 941. 4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस असाच सुरू राहिला तर, पुढच्या वर्षी मुंबईकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही.



हेही वाचा-

मुंबईत पावसाचे पुन्हा कमबॅक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा