इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली.
यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. ( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.
मुंबई (Mumbai) शहरातील दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असलेल्या धारावी येथे आज कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित केवळ एक रुग्ण आढळला. तर दादर (Dadar) येथे आज कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation ) दिली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) आज (२६ डिसेंबर २०२०) सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात मंबईमध्ये ४६३ रुग्ण बरे झाले. आता सध्या मुंबईत ८२७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई महापालिकेने माहिती देताना पुढे सांगितले की, मुंबई शहरातून आजअखेर २,७०,१३५ जण कोरोनावरील उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले. मुंबई शहरामध्ये कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे सरासरी प्रमाण हे ९३% इतके राहिले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या दुप्पटीचा वेग ३६३ दिवसांवर पोहोचला आहे. तर कोविड वाढीचा दर १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत ०.२१ % इतका राहिला आहे.