Advertisement

Guidelines for weddings: आता, लग्न समारंभात उपस्थित राहू शकतात ५० जण

आता ५० जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Guidelines for weddings: आता, लग्न समारंभात उपस्थित राहू शकतात ५० जण
SHARES

कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता ५० जणांच्या (50 people can attend a wedding In Maharashtra says minister vijay wadettiwar) उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

मार्च ते मे या ३ महिन्यांत लग्नाचा हंगाम असतो. या तीन महिन्यात अनेक लग्नसमारंभ होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या तीनही महिन्यात अनेक लग्न रखडली. लग्नाचे हॉल यांच्यावरही बंदी घालण्यात आल्यामुळे हॉलमालकांना अॅडव्हान्स घेतलेले पैसे परत द्यावे लागले. ज्या लोकांनी या नियमांचं उल्लंघन करून लग्नकार्य केलं त्यांच्या हाती पोलिसांच्या बेड्या पडल्याच्या अनेक घटना देखील घडल्या. या सर्व परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडण्यास मंजुरी दिली होती. परंतु महाराष्ट्रात मात्र ही बंद कायम होती. अखेर राज्य सरकारने देखील यावर सकारात्मक विचार केला आहे.

यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टन्सिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल/सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून शासनाने या बाबतीत निर्णय घेतला आहे. 

नागरिकांची मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे, खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचंही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा