Advertisement

आयकर विभागानं ५५ कोटींना विकल्या नीरव मोदीच्या पेंटिंग्ज

पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा गंडा घालणारा फरार आरोपी नीरव मोदीच्या संग्रहातील एकूण ६८ पेंटिंग्जचा लिलाव मंगळवारी आयकर विभागानं केला. त्यामध्ये ६८ पेंटिंग्ज पैकी ५५ पेंटिंग्जची विक्री करण्यात आली आहे.

आयकर विभागानं ५५ कोटींना विकल्या नीरव मोदीच्या पेंटिंग्ज
SHARES

पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा गंडा घालणारा फरार आरोपी नीरव मोदीच्या संग्रहातील एकूण ६८ पेंटिंग्जचा लिलाव मंगळवारी आयकर विभागानं केला. त्यामध्ये ६८ पेंटिंग्जपैकी ५५ पेंटिंग्जची विक्री करण्यात आली आहे. या लिलावातून आयकर विभागाला ५४.८४ कोटी रुपये मिळाले आहेत. निरव मोदी याला इंग्लंडमध्ये अटक केल्यानंतर आयकर विभागानं पेंटिंग्जचा लिलाव ठेवला होता.


९५ कोटींची थकबाकी

आयकर विभागाकडं निरव मोदीची सुमारे ९५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यामुळं थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागानं पेटिंगचा लिलाव केला. या लिलावातून ५९.३७ कोटी रुपये मिळाले. लिलावासाठी मदत घेतलेल्या कंपनीचं कमिशन देऊन आयकर विभागाला ५४.८४ कोटी रुपये मिळाले आहेत. लिलावासाठी आयकर विभागानं सॅफ्रन आर्ट कंपनीची मदत घेतली होती.


महान चित्रकारांच्या पेंटिंग्ज

निरव मोदीच्या संग्रहात राजा रवी वर्मा, व्ही. एस. गायतोंडे, एफ. एन. सूजा, जगन चौधरी आणि अकबर पद्मसी आदी महान चित्रकारांच्या पेंटिंग्ज होत्या.  ५५ पेंटिंग्जपैकी महान चित्रकारांच्या दोन पेंटिंग्ज तब्बल ३६ कोटींच्या घरात विकल्या गेल्या आहेत. व्ही.एस. गायतोंडे यांचं 'Untitled oil on canvas' हे पेंटिंग्ज २५.४ कोटींना विकलं आहे. तर राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेलं 'The Maharaja of Tranvancore', हे पेंटिंग्ज तब्बल १४ कोटी रुपयांना विकलं आहे.



हेही वाचा -

पालिकेचा निषेध करण्यासाठी लोअर परळच्या व्यापारी मंडळाचं आंदोलन, दुकानं बंद

भारताची अंतराळ 'शक्ती', ३ मिनिटांत पाडला उपग्रह



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा