Advertisement

कुर्ला स्कायवॉकचे काम अर्धवटच


कुर्ला स्कायवॉकचे काम अर्धवटच
SHARES

कुर्ला - रेल्वेनं कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जोडण्यासाठी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतलाय. स्कायवॉकचं काम सुरू झालं असून काम अर्ध पूर्णही झालंय. काम अर्धवट झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रवासी या स्कायवॉकचा वापर देखील करु शकत नाहीत. तसंच या अर्धवट काम केलेल्या स्कायवॉकमुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते. स्कायवॉकला पब्लिक ब्रीजसोबत जोडलं गेलं, मात्र फाटकाच्या आधीच या स्कायवॉकचं काम थांबवण्यात आलं. ज्यामुळे नागरिकांना फाटक क्रॉस करुन जावं लागतं. तर या अर्धवट काम झालेल्या स्कायवॉकमुळे खूप त्रास होत असल्याचं आणि फाटकातून प्रवास करताना अनेकदा लुट झालेल्या घटनाही घडल्या असल्याचं प्रवासी मोहम्मद शेख यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय