Advertisement

२६ जुलैला पुन्हा मुसळधार? वेधशाळेचा खबरदारीचा इशारा

पुढील ५ दिवसांत २४ ते २८ जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागा (IMD)ने देखील वर्तवली आहे.

२६ जुलैला पुन्हा मुसळधार? वेधशाळेचा खबरदारीचा इशारा
SHARES

येत्या २६ जुलैला मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. तर पुढील ५ दिवसांत २४ ते २८ जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागा (IMD)ने देखील वर्तवली आहे. 

सद्यस्थितीत पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये पाऊस  सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईतला पाऊस वाढेल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकणातील उत्तर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे. पण लवकरच मुंबईसह कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजेपासून शेवटच्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये १६ मिमी पाऊस झाला. मान्सूनच्या वाढत्या प्रभावामुळे २५ जुलैपासून  पाऊस वाढू शकतो. 

मुंबईत काही ठिकाणी मध्यम पाऊस अपेक्षित आहे. २६ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढेल. तसंच २७ आणि २८ जुलै रोजी देखील शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. पावसाची सरासरी तीन अंकी आकडा गाठेल. वॉटर लॉगिंग आणि ट्रॅफिक जामची परिस्थितीही दिसून येईल.



हेही वाचा-

मुंबईजवळील या '५' धबधब्यांवर लुटा मनमुराद आनंद

खूशखबर! मुंबईत शनिवारपासून पाणीकपात नाही



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा