भारतीय नौदलाने वाचवले चार खलाशांचे प्राण

  Mumbai
  भारतीय नौदलाने वाचवले चार खलाशांचे प्राण
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
  मुंबई  -  

  मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्या टग बोटीतून चार खलाशांची नौदलाच्या मदतीने सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

  राजभवनासमोरील समुद्रात जेथे छत्रपती शिवजी महाराजांचे स्मारक बांधले जाणार आहे. त्या ठिकाणी खडकात एक सोनिका नावाची टग बोट बूडत असल्याचं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सोमवारी रात्री समजले.  मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण खडकाळ भाग आणि उथळ पाण्यामुळे पोलीस तिथे पोहचू शकत नव्हते.

  शेवटी नौदलाच्या मदतीने आयएनएस शिक्रावरून नेव्हीच्या सी किंग जातिची हेलिकॉप्टर घटनास्थळाच्या दिशेने झेपवली आणि बुडाणाऱ्या बोटीवरील चारही खलाशांची त्यांनी सुखरूप सुटका केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.