Advertisement

शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या रिहानाचा भारतीय गुगलवर शोधत आहेत धर्म

रिहाना नक्की आहे कोण हे जाणून घेण्यासोबतच तिच्या धर्माबद्दल भारतीय सर्वाधिक सर्च करत असल्याचं गुगल ट्रेण्ड्समधून दिसून येत आहे.

शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या रिहानाचा भारतीय गुगलवर शोधत आहेत धर्म
SHARES

मंगळवारी शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानं पाठिंबा दर्शवला. सीएनएनच्या वृत्ताची लिंक शेअऱ करत चर्चा का केली जात नाही असा प्रश्न तिनं उपस्थित केला. तिच्या या ट्विटमुळे आता भारतीयांमध्ये तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत आहे.

विशेष म्हणजे रिहाना नक्की आहे कोण हे जाणून घेण्यासोबतच तिच्या धर्माबद्दल भारतीय सर्वाधिक सर्च करत असल्याचं गुगल ट्रेण्ड्समधून दिसून येत आहे. रिहाना मुस्लीम आहे का? असा प्रश्न भारतीय नेटकरी गुगलवर सर्च करत असल्याचं गुगल सर्च ट्रेण्डमध्ये दिसत आहे.

नक्की कोण आहे रिहाना? त्याबरोबरच तिचा धर्म कोणता आहे? यासंदर्भात सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण अचानक वाढले आहे. गुगल सर्चमध्ये ‘Is Rihanna Muslim?’, ‘Rihanna religion’ या दोन वाक्यांची वाढ झाल्याचx दिसत आहे. त्याचबरोबर भारतीयांकडून रिहानासंदर्भात केल्या जाणाऱ्या सर्चमध्ये तिची गाणी तसेच तिचा जन्म कुठे झाला आहे, यासंदर्भात सर्च करण्यात आल्याचं दिसत आहे.

तिच्या ट्विटवरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. रिहानानं हा मुद्दा मांडल्यानं अनेकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची दखल घेतली जाईल, असं म्हटलं आहे.

तर रिहानानं हे ट्विट पैसे घेऊन केल्याचा आरोप या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी केला आहे. ज्या गोष्टीबद्दल रिहानाला काहीही माहिती नाही, त्याबद्दल तिने बोलू नये, असं मतही या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

रिहानाने दिल्लीच्या सीमेवरील भागात आंदोलन सुरु असणाऱ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख असणारे वृत्त शेअर केल्यानंतर तिच्यासंदर्भातील गुगल सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढले आहे.

थेट ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने भाष्य केल्यामुळे तिचे ट्विट जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा