Advertisement

इंदिरानगरमधील विकासकामांना सुरुवात


इंदिरानगरमधील विकासकामांना सुरुवात
SHARES

इंदिरानगर - उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सुनील प्रभू, माजी नगरसेवक गणपत वारीसे यांच्या प्रयत्नानं दिंडोशीतल्या इंदिरानगर परिसरात मंगळवारी रात्री विविध प्रस्तावित नागरी कामांना सुरुवात करण्यात आली.
इंदिरानगरमध्ये 12 इंच व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची नवीन लाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील किमान 1 ते 2 हजार रहिवाशांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसंच इंदिरानगरमध्ये येथे सुसज्ज व्यायामशाळा आणि सुलभ शौचालयाच्या कामाचीही या वेळी सुरुवात करण्यात आली.
या वेळी उपविभागप्रमुख सुहास वाडकर, नगरसेविका सायली वारीसे, माजी नगरसेवक गणपत वारीसे, शाखाप्रमुख भाई परब, विद्या गावडे, उपशाखाप्रमुख रामआसरे यादव, योगेश बने, संजय झा, युवासेना शाखा अधिकारी सुहास चावरे, महापालिकेचे पाटील, देशमुख तसेच विभागातील गटप्रमुख, युवासैनिक आणि उत्तर भारतीय नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा