Advertisement

'सीएम साहेब आमच्याकडेही लक्ष द्या'


SHARES

जोगेश्वरी - रेल्वे प्राधिकरणाच्या कार्यालयाजवळ असलेल्या इंदिरानगरमधल्या रहिवासी संघातल्या 120 घरांवर तोडक कारवाईची टांगती तलवार लटकतेय. 1975 पासून इथे रहिवासी राहत आहेत. परंतु ही जागा रेल्वेच्या अंतर्गत येत असून घरे खाली करा अशी नोटीस रेल्वेकडून वारंवार बजावण्यात येत आहे. काबाड कष्ट केल्यानंतर कुठे इथल्या रहिवाशांनी ही घरे उभारली. डोक्यावरचे छत गेले तर राहायचे कुठे हाच प्रश्न सध्या या रहिवाशांना पडला आहे.

पूनर्वसन आणि घरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असते तर कदाचित ही तोडक कारवाई थांबली असती, असा आरोप रहिवाशांनी केलाय. त्यामुळे जोगेश्वरीतच आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी हे रहिवासी करत आहेत. अधिकृत रहिवासी असूनही आमच्यावर हा अन्याय का केला जातोय? असा प्रश्न या रहिवाशांना पडलाय. त्यामुळे सीएम साहेब आमच्याकडेही लक्ष्य द्या अशी विनंतीच हे रहिवासी करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा