इंदिरानगर झोपडपट्टीचा पुनर्विकास लागणार मार्गी

 Sham Nagar
इंदिरानगर झोपडपट्टीचा पुनर्विकास लागणार मार्गी

जोगेश्वरी - इंदिरानगर झोपडपट्टीचा रखडलेला पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे. पुनर्विकास रखडवणाऱ्या बिल्डरला गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दणका दिला आहे. हा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी नव्या बिल्डरची नेमणूक करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला वायकर यांनी बुधवारी दिले.

इंदिरानगर झोपडपट्टीत 987 रहिवासी राहतात. त्यापैकी 872 रहिवासी पुनर्विकासासाठी पात्र ठरले आहेत. बिल्डरने दोन इमारती बांधल्या असून यात 377 घरे आहेत. या घरांना ओसीही मिळाली आहे. मात्र या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. मुलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नाहीत. जे रहिवाशी भाड्याने इतरत्र गेले आहेत त्यांना भाडे देणेही बिल्डरने बंद केले आहे. या सर्वांची दखल घेत नव्या बिल्डरची निवड करण्याचे आदेश वायकर यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सध्याच्या बिल्डरची हाकलपट्टी होणार आहे. दरम्यान रहिवाशांना आता नव्या योजनेंतर्गत 225 ऐवजी थेट 269 चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading Comments