• आयएनएस कारवार आणि काकीनाडा नौदलातून निवृत्त
  • आयएनएस कारवार आणि काकीनाडा नौदलातून निवृत्त
  • आयएनएस कारवार आणि काकीनाडा नौदलातून निवृत्त
SHARE

नौदलातील आयएनएस कारवार आणि आयएनएस काकीनाडा नावाच्या दोन सुरुंग नाशक जहाजांना मंगळवारी सेवेतून निवृत्त करण्यात आलं. नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थित या दोन्ही जहाजांना सेवानिवृत्त करण्यात आलं. अॅडमिरल सुनील लांबा हे आयएनएस काकीनाडाचे दुसरे कमांडिंग ऑफिसर राहिल्याने त्यांचं या जहाजाशी एक वेगळच नातं होतं. या दोन्ही बोटींनी आजपर्यंत अगणित समुद्री सुरुंग शोधून काढले असून, सुरुवातीला ही दोन्ही जहाजं जुन्या स्वीप तंत्रज्ञानाचा वापर करत होती. जहाजांच्या नुतनीकरणांनंतर 'साईड स्कॅन सोनार'च्या मदतीने त्या आपलं ऑपरेशन पार पाडत असत.आयएनएस कारवार (M67) हे 'नाट्य'वर्गातील पहिलंच सुरुंग नाशक जहाज असून, 14 जुलै 1986 साली भारतीय नौदलात दाखल झालं होतं. तेव्हाच्या सोव्हियत संघाकडून घेण्यात आलेल्या या सुरुंग विनाशिकेने "हमेशा तय्यार" चा नारा देत 30 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली. कमांडर आर. के. सिन्हा हे या जहाजाचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते तर कमांडर कौशिक धार हे या जहाजाचे शेवटचे कमांडिंग ऑफिसर होते.

आयएनएस काकीनाडा (M70)ही 'नाट्य' वर्गातील दुसरी सुरुंगनाशिका असून, ती देखील 1986 साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तिचे पहिले कमांडिंग ऑफिसर हे लुटेनंट कमांडर सतीश सोनी होते तर कमांडर अमरजित सिंग युमनम हे या बोटीचे शेवटचे कमांडिंग ऑफिसर होते. भारतीय नौदलात दाखल झाल्यावर या दोन्ही बोटी विशाखापट्टणम येथून ऑपरेट होत असून, 2013 साली त्यांना मुंबईला हलवण्यात आलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या