Advertisement

'तेज..तीव्र आणि निर्भिड' तारासा नौदलात दाखल!


'तेज..तीव्र आणि निर्भिड' तारासा नौदलात दाखल!
SHARES

'तेज...तीव्र...निर्भिड' हे या ब्रिदवाक्याच्या घोषणा देत आयएनएस तारासा ही युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलात दाखल झाली. समुद्र तटांची रक्षा करणे, समुद्री चाचे, तस्करांवर अंकुश ठेवणे ही या नौकाची मुख्य जबाबदारी असेल.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तारासासारख्या फास्ट अटॅक क्राफ्टची गरज निर्माण झाली होती. टारमुगली क्लासची ही शेवटची बोट असून पश्चिम किनाऱ्याच्या तब्बल 2000 किलोमीटर पर्यंतच्या परिसरावर ही बोट लक्ष ठेवणार आहे.



कार निकोबार क्लासच्या एफ. ए. सी चे हे आधुनिक रुप असून त्यात तब्बल 11,000 हॉर्स पॉवरचे MTU 16 V 4000 चे तीन इंजिन बसवण्यात आले आहेत. या बोटीत 35 नॉट्स (65 किमी) प्रति तास वेगाने जाण्याची क्षमता आहे. 15 दिवस समुद्रात रहाण्याची या बोटीची क्षमता आहे.

तारासावर CRN 91 गन बसवण्यात आली असून तब्बल 5 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्यास ती सक्षम आहे. तब्बल 2000 किलोमीटर परिक्षेत्राची जबादारी संभाळण्याची क्षमता असलेल्या या बोटीवर चार अधिकाऱ्यांसह 41 नौसैनिक (सेलर्स) असतील. लेफ्टनंट कमांडर प्रदीप कुमार यांना या बोटीची जबाबदारी देण्यात आली आहे. 



26/11 सारख्या हल्ल्यांचा सामना करण्यात या बोटीची मदत होणार आहे. समुद्राच्या तटाची रक्षा करण्यात या बोटीची भूमिका महत्त्वाची असेल. समुद्री चाचे आणि तस्करांविरोधात देखील या बोटीचा वापर होणार आहे.

गिरीश लुथरा, वाईस अॅडमिरल, फ्लॅग ऑफिसर, सीएनसी वेस्टर्न नेव्हल कमांड



हेही वाचा - 

‘विक्रांत’च्या अपयशानंतर ‘विराट’ वाचवण्याची शिवसेनेची मागणी

अखेरचा हा तुला दंडवत !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा