Advertisement

योगा दिनानिमित्त R Central वॉर्डमध्ये 'या' 10 ठिकाणी शिव योगा केंद्रे सुरू

आठवड्यातून ५ दिवस चालणा-या या केंद्रात नागरिकांकडून कुठलेही पैसे आकारले जाणार नाहीत. पालिका तर्फे मोफत योगा केंद्र विनामूल्य राबवली जात आहेत.

योगा दिनानिमित्त R Central वॉर्डमध्ये 'या' 10 ठिकाणी शिव योगा केंद्रे सुरू
SHARES

मुंबईत (MUMBAI) नागरिकांना योगाचे (Yoga training) धडे दिले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या जून २०२२ पासून शिव योग केंद्रे (Shiv yoga center)सुरु करण्यात येणार होती.

त्यानुसार वॉर्ड RC (R Central) मध्ये उद्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत योगा केंद्राची सुरुवात केली जाणार आहे. कुठल्या कुठल्या ठिकाणी ही योगा केंद्र सुरू होणार आहेत याची माहिती देण्यात आली आहे. 

सोमवार ते मंगळवार सकाळी ७ ते ८ या वेळेत हे योगा केंद्र सुरू राहतील. योगाचे धडे देण्यासाठी  प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. यासाठी नागरिकांकडून कुठलेही पैसे आकारले जाणार नाहीत. पालिका तर्फे मोफत योगा केंद्र सुरू केली जात आहेत. 

यासाठी किमान ३० नागरिकांच्या समुहाने आपल्‍या विभाग कार्यालयाकडे निर्धारित पद्धतीनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे. 

या योगा केंद्रांसाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरु केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरु होतील. यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.

तुमच्या परिसरात योगा केंद्र सुरू करण्यासाठी काय कराल? 

इच्छुक नागरिकांच्या समुहासाठी समुह असेल. या सोबतच ज्या समुहाकडे शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल इत्यादींची सोय असल्यास ती ठळकपणे नमूद केल्यास त्यांना प्राधान्य.

ही जागा मोफत उपलब्ध होण्यारकरिता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल अथवा समाज कल्याण केंद्र इत्यादी असे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येईल.

शिव योग केंद्राची पूर्वतयारी, अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. ‌

ज्या योग प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल, त्या संस्थेला सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत देण्यात आलेल्या महितीनुसार विभागवार योग केंद्रावर प्रशिक्षित व अनुभवी योग प्रशिक्षकाची नेमणूक करणे, ५ दिवस योग प्रशिक्षक उपस्थित राहील याची खबरदारी घ्यावी लागेल.

संस्थेद्वारे नेमण्यात येणा–या योग प्रशिक्षकाला नेमून दिलेल्या शिव योगा केंद्रावर नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल.

किमान ३० नागरिकांच्या गटासाठी एक ‘शिव योग केंद्र‘ सुरू करण्यात येईल, एका गटाचा योग प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असेल व प्रशिक्षणाचा कालावधी प्रति‍दिन १ तासाचा असेल. ५ दिवस सकाळी ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा