Advertisement

नेट कनेक्ट महापालिका


नेट कनेक्ट महापालिका
SHARES

मुंबई - आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात इंटरनेट सेवा सुविधांचा वापर होत असताना महापालिकेनेही आपल्या कार्यालयातील नेट कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारती, शाळा, मुख्य आरोग्य केंद्रे आणि अग्निशमन केंद्रे आदी ठिकाणी  वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक सल्ला घेतला जात आहे. सल्लागाराच्या सल्ल्यानुसार सर्व ठिकाणी स्वतंत्र इंटरनेट लिंकद्वारे वायफायची इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असून मुंबई हे शहर आतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून ओळखले जाते. मुंबईतील जनतेला नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका मुख्यालय, कार्यालये तसेच शाळा, आरोग्य केंद्र, अग्निशमन दल याठिकाणी इंटरनेट वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवकांकडून होत होती. भाजपाचे विद्यमान नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी केली होती.
नगरसेवकांच्या मागणीनुसार इंटरनेटची वायफाय सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या सर्व ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान सल्लागारांची नियुक्ती करून सल्ला घेतला जात आहेत. त्यांनी दिलेल्या तांत्रिक सल्ल्यानुसार आयटी सेक्युरिटी कारणास्तव वायफाय इंटरनेटवरून न देता यासर्व ठिकाणी स्वतंत्र इंटरनेट लिंकद्वारे इंटरनेटची वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. मुख्य इमारती, शाळा, मुख्य आरोग्य केंद्र आणि अग्निशमन केंद्र याठिकाणांसह महापालिकेच्या मुख्यालयांमध्ये वायफायची सुविधा पुरवण्यासाठी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड(एमटीएनअल) यांच्यातर्फे चाचणी तत्वावर इंटरनेट लिंक घेण्यात आली आहे. या लिंकबाबतचा अहवाल पाहून महापालिका मुख्यालयात नजिकच्या काळात महानगर टेलिफोन निगम यांच्या मार्फत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली आहे.

वायफाय सेवेबद्दल स्थायी समिती सदस्य अज्ञान

महापालिका स्थायी समिती सभागृहात जून 2016 पासून वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देऊन दहा महिने उलटत आले तरीही स्थायी समिती सदस्यांना याची कल्पनाही नाही. स्थायी समितीच्या यापूर्वीच्या महापालिकेतील शेवटच्या सभेत तत्कालिन भाजपाचे सदस्य दिलीप पटेल यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयातच हरकतीचा मुद्दा उपस्थित करत स्थायी समिती सभागृहात वायफायची सेवा देण्याची मागणी केली होती. परंतु त्यावेळीही प्रशासनाला या वायफाय सेवेची माहिती सदस्यांना देता आली नव्हती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा