वस्तूसंग्रहालयासाठी राणीबागेची जागा नाही

 Pali Hill
वस्तूसंग्रहालयासाठी राणीबागेची जागा नाही

मुंबई - भायखळ्यातील भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयासाठी राणीबागेची जागा मिळणार नसल्याची भूमिका पालिकेनं घेतल्याची माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली आहे. वस्तूसंग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी नजीकच्या राणीबागेतील मैदानाची जागा मागितली होती. यासंबंधी गुरूवारी पालिकेत वस्तूसंग्रहालयाचे विश्वस्त आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेने राणीबागेची जागा न देण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी वस्तूसंग्रहालयात कोणताही कार्यक्रम करावयाचा असल्यास त्यासाठी पालिकेची परवानगी घेणेही यापुढे बंधनकारक असणार आहे. तर वस्तूसंग्रहालयाच्या आर्थिक व्यवहारांवरही पालिकेची नजर असणार आहे. त्यासाठी वस्तूसंग्रहालयाचे ऑडीट पालिकाच करणार आहे.

Loading Comments