Advertisement

सर्व सामान्यांचा खिशाला कात्री, मुंबईत दाढी आणि केस कापणं महागणार

मुंबईसह देशभरात दाढी आणि केस कापणं महाग होणार आहे.

सर्व सामान्यांचा खिशाला कात्री, मुंबईत दाढी आणि केस कापणं महागणार
SHARES

मुंबईसह देशभरात दाढी आणि केस कापणं महाग होणार आहे. मुंबईत आज सलून, ब्युटीपार्लर (Salon, beauty parlor) कामगार युनियनची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा दाढी, केस कापण्याच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या महागाईमुळे वाढलेला कौटुंबिक खर्च आणि व्यावसायिक खर्च, सलून सेवेचे भाव याचा योग्य ताळमेळ बसवण्यासाठी १ मे २०२२ रोजी कामगार दिनाचं औचित्य साधून संपूर्ण भारतभर कुशल सलून सेवकांच्या सलून सेवा भावात वाढ केली जाणार आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दाढी, कटिंगच्या दरात ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय मुंबई आणि महाराष्ट्राच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर अर्धकुशल सलून सेवकांच्या दरात ३० टक्के भाववाढ जाहीर करण्यात आलीय.

सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढलेला असल्याचं दिसून आलं आहे. या वाढत्या महागाईनं सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे.

रिझर्व बँकेनं किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचं जाहीर केलं आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किंमती, खाद्य पदार्थांच्या किंमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.

किरकोळ बाजारातील महागाईचा दर असात वाढत राहिला तर आरबीआयला कर्जावरील व्याजाचा दरही वाढवावा लागू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या आरबीआयनं घातलेल्या किरकोळ बाजारातील महागाईच्या दरापेक्षा दोन टक्के जास्त महागाई दर असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.



हेही वाचा

पालिकेकडून 'या' वॉर्डांमधील फूटपाथच्या सुशोभीकरण, दुरुस्तीचा प्रस्ताव

पर्यटकांसाठी आता गिरगाव चौपाटीवरही ‘व्ह्युईंग डेक’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा