Advertisement

डोंबिवलीहून थेट वसई विरार पर्यंत जेट्टीने जाता येणार

डोंबिवली ते ठाणे गायमुखपर्यंत पहिल्या टप्प्यातील जलप्रवास लवकरच सुरू केला जाईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्र्यांकडून लवकरच पाहणी होणार आहे.

डोंबिवलीहून थेट वसई विरार पर्यंत जेट्टीने जाता येणार
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील मुख्य मुद्दा असलेल्या वॉटर टॅक्सीचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

डोंबिवली ते ठाणे गायमुखपर्यंत पहिल्या टप्प्यातील जलप्रवास लवकरच सुरू केला जाईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांच्यासह मंत्र्यांकडून लवकरच पाहणी होणार आहे.

मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकल्पाचं निरिक्षण करत आहेत.

डोंबिवली (dombivli) वरून सुरू होऊन ही ई-वॉटर टॅक्सी (E-water taxi) ठाणे, मिरा-भाईंदर आणि डोंबिवली, दिवा, ठाण्यापासून थेट नवी मुंबईपर्यंत दोन मार्गांवर धावणार आहे.

काम पूर्ण होताच, आवश्यक सुरक्षा चाचण्या करून हा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र तिकीटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2025 मध्ये मुंबईला (mumbai) उपनगरांशी जोडण्यासाठी तब्बल 10,000 वॉटर टॅक्सी सुरू करण्याची योजना मांडली होती.

कल्याण-डोंबिवलीपासून ते अगदी वसई-विरारपर्यंत (virar) या सेवा विस्तारण्यात येतील. त्यामुळे जलवाहतुकीद्वारे नवी मुंबई विमानतळापर्यंत 70 मिनिटांत पोहोचता येणार आहे.

राज्य सरकार सध्या मुंबई महानगर प्रदेशात 6,066 कोटी रुपये खर्च करून जलवाहतुकीचे जाळे उभारणार आहे. पण यापूर्वी सुरू असलेल्या जलमार्गांवरील सेवांना फारसे यश मिळालेले दिसत नाही आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे (thane), कल्याण, वसई (vasai road) आणि मिरा-भाईंदरमध्ये जलमार्गाचे 340.68 किलोमीटर लांब जाळ्याचा विस्तार सुरू आहे. पण हे सर्व प्रकल्प फार खर्चिक असल्याने तिकिटांचे दरही जास्त असतात.

यापूर्वीही सुरू केलेल्या काही सेवा अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आल्या होत्या. 



हेही वाचा

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा

उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा