Advertisement

Jaipur-Mumbai Train Firing: चेतन सिंग संदर्भात धक्कादायक माहिती उघड

चेतन सिंग यांने ३१ जुलैच्या पहाटे जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळ गोळीबार केला होता.

Jaipur-Mumbai Train Firing: चेतन सिंग संदर्भात धक्कादायक माहिती उघड
SHARES

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कॉन्स्टेबल चेतन सिंग, ज्याने गेल्या महिन्यात चालत्या ट्रेनमध्ये आपल्या वरिष्ठ आणि तीन मुस्लिम प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली, त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांना बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी १४ ऑगस्ट रोजी जारी केला होता.

चेतन सिंह संदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये त्याने एका मुस्लिम व्यक्तीला पोलीस चौकीत बोलावून त्याच्यावर अत्याचार केला. यासाठी त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे. 

त्यानंतर 2011 मध्ये, त्याने अधिकृततेशिवाय सहकाऱ्याच्या कार्डमधून 25,000 रुपये काढले. शिवाय, भावनगरमध्ये त्याने एका सहकाऱ्याला मारहाण केली. या दोन्ही घटनांमध्ये त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली.

जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबाराच्या घटनेबद्दल

चेतन सिंग (33) यांने 31 जुलैच्या पहाटे जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळ असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीणा आणि तीन मुस्लिम प्रवाशांची हत्या केल्याचा आरोप आहे.

अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरवाला, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख हे तिघे प्रवासी ट्रेनच्या वेगवेगळ्या बोगीतून प्रवास करत होते. त्यानंतर सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) चेतन सिंगला अटक केली.

चेतनने कथितपणे प्रथम RPF च्या सहाय्यक उपनिरीक्षक मीना आणि B5 कोचमधील एका प्रवाशाला त्याच्या स्वयंचलित सेवा शस्त्राने गोळ्या घालून ठार केले. जीआरपीनुसार, त्यानंतर त्याने ट्रेनच्या पेंट्री कारमधील आणखी एका प्रवाशाला आणि S6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार केले.



हेही वाचा

कल्याण : तरूणाचा 12 वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला, आईसमोरच सोडला जीव

महिलेला धक्का लागल्याने प्रवाशाला दाम्पत्याकडून मारहाण, प्रवाशाचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा