खोदकाम करताना जेसीबी मशिनला आग

कांजुरमार्ग - येथील गांधीनगर येथे रात्री 2 .30 च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर गांधीनगर सर्कल येथे जेसीबीच्या मदतीने रस्ता खोदकाम सुरु होते. त्यावेळेस जेसीबी मशीनचा रस्त्या खालून जाणाऱ्या गॅस पाईपलाईनला धक्का लागला. तेव्हा जेसीबी मशीनने पेट घेतला आणि आग लागली. अग्निशमन दलाच्या दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. या दुर्घटनेत रामसिंग राठोड ,गजानन जाधव ,गजानन पवार हे कामगार जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Loading Comments