Advertisement

सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन्ससाठी जोगेश्वरीत उभारणार मेंटेनन्स डेपो

डेपोच्या बांधकामासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन्ससाठी जोगेश्वरीत उभारणार मेंटेनन्स डेपो
SHARES

वंदे भारत ट्रेनला देखभालीसाठी मुंबईत हक्काचं ठिकाण मिळालं असून यासाठी वाडीबंदर नंतर आता जोगेश्वरीमध्ये मेंटेनन्स डेपो उभारला जाणार आहे. जोगेश्वरी येथे वंदे भारत ट्रेन्ससाठी नवीन टर्मिनस बांधण्याची घोषणा आधीच करण्यात आली असून त्यावर काम सुरू झाले आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनसाठीचा मुंबई शहरातील वाडी बंदरनंतर जोगेश्वरी हा दुसरा डेपो असणार आहे.

वंदे भारतसाठीचा डेपो मुंबईत जोगेश्वरी ते राम मंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणार आहे. या डेपोसाठी एकूण 60 कोटी रुपये खर्च येणार आहे. पश्चिम रेल्वेला 20 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर या कामासाठी चालू महिन्यात निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. पश्चिम रेल्वे या डेपोमध्ये एसी स्लीपर वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनची देखभालीचे काम करणार आहे.

रेल्वे खात्याने वंदे भारत ट्रेनसाठीच्या डेपो उभारणीसाठी मुंबई सेंट्रल आणि जोगेश्वरी अशी दोन ठिकाणाची पाहणी केली होती. मुंबई सेंट्रलऐवजी जोगेश्वरी येथे मोठी जागा उपलब्ध होत असल्याने तेथे हा डेपो बांधला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या डेपोमध्ये वंदे भारत ट्रेन धुण्यासाठी 10 रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र वॉशिंग लाईन असेल.

शिवाय जोगेश्वरी येथे 69 कोटी रुपये खर्च करून नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या डेपोत 24 गाड्या ठेवण्याची क्षमता असणार आहे.

जोगेश्वरी येथे 600 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आकाराचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅक असणार आहेत. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना रेल्वेगाडीतून चढता आणि उतरता येणार आहे. या रेल्वे टर्मिनसमुळे गुजरातकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.

शिवाय मुंबईतील बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वसई आणि उत्तर-पश्चिम उपनगरातील भागांत राहणाऱ्या किंवा तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत जाण्याची गरज राहणार नाही.



हेही वाचा

मुंबईकरांनो खुशखबर! लवकरच बेस्ट बसेस अटल सेतूवरून धावणार

राज्यातील 5000 एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा