Advertisement

एव्हरशाइन जॉगर्स पार्कची दुरवस्था


एव्हरशाइन जॉगर्स पार्कची दुरवस्था
SHARES

ठाकूर व्हिलेज - कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेजमधील एव्हरशाइन जॉगर्स पार्कची दुरवस्था झाली आहे. दररोज मोठया संख्येनं स्थानिक रहिवासी या पार्कमध्ये सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारायला येतात. मात्र उद्यानाच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. भरीस भर म्हणून पार्कमधील शौचालयातही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.
वारंवार आर दक्षिण पालिका विभागाच्या उद्यान विभागाकडे तक्रार करण्यात आली, मात्र या तक्रारीची दखल न घेता दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक सुरेश सहानी यांनी केला आहे. या उद्यानाबाबत उदयान विभागाला कळवण्यात येईल, तेथील समस्यांचा अहवाल तयार करून पुढील कारवाई करण्यात येईल, असं आर दक्षिण पालिका सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा