महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार

 BMC office building
महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
महापौरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
See all

परळ - लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेने समाजाला योग्य न्याय देण्याचे कार्य केले आहे. मात्र हा न्याय मिळवून देताना पत्रकारांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर असल्याचं मत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केलं. जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने 8 जानेवारीला परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

कोणत्याही परिस्थितीत न डगमगता चालू घडामोडी तळागाळात पोहोचवण्याचे चोख काम पत्रकार करत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेकडून पत्रकारांना जे अपेक्षित आहे ते नक्कीच देऊ, तसेच पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू अशी ग्वाही देखील आंबेकर यांनी यावेळी दिली.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, वसानी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ, सरचिटणीस हेमंत सामंत, उपाध्यक्ष जयराम सावंत, राजेंद्र जाधव, सतिश साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments